महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

"द एम्पायर" वेबसिरीज कायमची बंद करा, भाजपची मागणी - कबीर खान दिग्दर्शित द एम्पायर

देशाच्या जडणघडणीमध्ये मोघलांचा खूप मोठा वाटा आहे, असे कबीर खान यांचे म्हणणे आहे. मात्र ज्या मोगलांनी देशात येऊन लूटमार केली, रक्तपात केला. अशा मोघलांचा देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचं वक्तव्य न पटणारे असल्याचे मत भाजपा आमदार राम कदम यांनी व्यक्त केले आहे.

"द एम्पायर" वेब सिरीज कायमची बंद करा
"द एम्पायर" वेब सिरीज कायमची बंद करा

By

Published : Aug 27, 2021, 12:12 PM IST

Updated : Aug 27, 2021, 5:18 PM IST

मुंबई-औरंगाजेबापासून मोगल बादशाहपर्यंत सर्वांनी भारताची लूट केली. देशभरात मोघल सम्राटांनी तांडव माजवले. मात्र, अशा मोगल बादशहांवर आधारित 'हॉटस्टार' या अॅपच्या माध्यमातून दी एम्पायर अशी वेब-सिरीज प्रसारित करण्यात येणार आहे. त्या वेबसिरीजच्या प्रसारणाला आमचा तीव्र विरोध असून या "द एम्पायर" सिरीजवर बंदी घालावी, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

"द एम्पायर" वेब सिरीज कायमची बंद करा, भाजपाची मागणी

मोगल बादशाह यांनी देशावर आक्रमणे करून रक्तपात केला. मंदिरांचा विध्वंस करून लोकांवर अत्याचार केले. त्या मोगलांचा जय-जयकार या चित्रपटातून केला जातोय. देशाच्या जडणघडणीमध्ये मोघलांचा खूप मोठा वाटा आहे, असे कबीर खान यांचे म्हणणे आहे. मात्र ज्या मोगलांनी देशात येऊन लूटमार केली, रक्तपात केला. अशा मोघलांचा देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचं वक्तव्य न पटणारे आहे. आमचा त्याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे हे विधान कबीर खान यांनी त्वरित मागे घ्यावे, आणि ही वेब सिरीज बंद करावी, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

काय म्हणाले होते कबीर खान-

कबीर खान यांनी एका प्रसार माध्यमाला मुलाखत देत असताना, मोघलांना चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात असल्याची खंत व्यक्त केली होती. भारतीय चित्रपटांमध्ये ऐतिहासिक पात्रांना रंगवण्यासाठी मोघलांना चुकीच्या पद्धतीने दाखवले जाते. मोगल हे चांगले शासक होते. देशाच्या जडणघडणीमध्ये मोघलांचा मोठा वाटा असल्याचे मत त्यांनी आपल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. त्यावरून भाजपा आता आक्रमक झाली आहे. तसेच आमदार राम कदम यांनी या वेबसिरीजच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी तांडवला केला होता विरोध-

चित्रपट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून कायमच हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जातो. असे म्हणत आमदार राम कदम यांनी यापूर्वी सैफ अली खानच्या वेबसिरीज तांडवला विरोध केला होता. तांडवमधून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ते दृश्य हटवले पाहिजे, असं ट्विट राम कदम यांनी केले होते.

Last Updated : Aug 27, 2021, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details