मुंबई - माणुसकीच्या नात्याने मजुरांना मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. मुळातच शिवसेनेचे सरकार कोरोनाशी लढण्यास फेल ठरले असून, खरी परिस्थिती पाहता सोनूवर आरोप करून सरकारचे अपयश लपणार नाही, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली.
सोनू सूदवर आरोप करून खरी परिस्थिती लपणार नाही, राम कदमांची संजय राऊतांवर टीका
'लॉक डाऊन' काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाब्बासकी दिली." अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या शिवसेनेचे मुखपत्र सामना वृत्तपत्रातून केली आहे.
'लॉक डाऊन' काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाब्बासकी दिली." अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या शिवसेनेचे मुखपत्र सामना वृत्तपत्रातून केली आहे. राऊत यांनी आपल्या या लेखातून सोनू सूद कोरोना काळात करत असलेल्या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यावरून आता आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.