महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी सलमान खानची मदत घेणार का? - राम कदम - सलमान खान मुद्यावरुन राम कदमाची टीका

सलमान खानला महाराष्ट्र सरकार लसीकरणाला गती यावी म्हणून घेणार आहे? की कोणत्या विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी? आम्हाला सलमान खान संदर्भात कोणताही प्रश्न नाही. मात्र भूतकाळ आठवता महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसच्या हेतूबाबत शंका जरूर आहे, असे राम कदम यांनी ट्विट करून म्हटले आहे.

राम कदम
राम कदम

By

Published : Nov 18, 2021, 12:24 AM IST

Updated : Nov 18, 2021, 12:36 AM IST

मुंबई -मुस्लिम बहुल विभागामध्ये लसीकरणाची मोहीम (Vaccination campaign) वाढवण्यासाठी अभिनेता सलमान खान (Salman Khan) व धर्मगुरूंची मदत घेणार असल्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर आता सरकारच्या या निर्णयावर भाजपा नेते आमदार राम कदम (Criticism of BJP MLA Ram Kadam) यांनी ट्विट करून ताशेरे ओढले आहेत. सलमान खानला महाराष्ट्र सरकार लसीकरणाला गती यावी म्हणून घेणार आहे? की कोणत्या विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी? आम्हाला सलमान खान संदर्भात कोणताही प्रश्न नाही. मात्र भूतकाळ आठवता महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसच्या हेतूबाबत शंका जरूर आहे, असे राम कदम यांनी ट्विट करून म्हटले आहे.

भाजपा आमदार राम कदम

राम कदमांची टीका

देशात कोरोना लसींचा 100 कोटींचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर महाराष्ट्रात १ कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाला आहे. परंतु आजही राज्यात बऱ्याच मुस्लिम बहुल भागांमध्ये लोकं अजूनही लस घेण्यासाठी पुढाकार घेत नाही आहेत. म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या मुस्लीम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात शंका असल्याने या भागांमध्ये लस घेण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. म्हणूनच आता राज्य सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार असल्याचे सांगितले होते. सलमानच्या मदतीने या मुस्लीम बहुल परिसरांमध्ये जनजागृती करुन येथील लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा सरकारचा विचार आहे. कोरोना लसीकरण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य आहे. मात्र काही भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, असे टोपे यांनी सांगितले होते. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावरून भाजपा नेते राम कदम यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते आरोग्य मंत्री?

जालन्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, मुस्लीम बहुल परिसरामध्ये अजूनही लसीबद्दल शंका आहे. आम्ही यासाठी आता सलमान खान आणि धर्मगुरुंची मदत घेणार असून मुस्लीम समाजातील सदस्यांनी लसीकरण करुन घेण्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत. धर्मगुरु आणि कलाकार यांचा सर्वसामान्यांवर फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच त्याचे म्हणणे लोक ऐकतील, असा विश्वास टोपेंनी व्यक्त केला आहे. सलमान खानचा मोठा चाहता वर्ग असून महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल, असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे.

हेही वाचा -कोरोना लसीचा संकोच हाच सर्वात मोठा धोका - अदर पूनावाला

Last Updated : Nov 18, 2021, 12:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details