महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar Mumbai Bank : महाविकास आघाडीला धक्का; मुंबै बँकच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रविण दरेकरांची निवड - प्रविण दरेकर मुंबई बँक अध्यक्ष

बहुचर्चित असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ( Mumbai District Central Cooperative Bank ) पुन्हा एकदा भाजपाने आपला दावा सिद्ध केला आहे प्रविण दरेकर यांनी पुन्हा एकदा ( Mumbai Co operative Bank President Pravin Darekar ) अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले आहे यामुळे राज्यपाठोपाठ मुंबई बँकेतही सत्तांतर झाल्याची चर्चा आहे.

Pravin Darekar Mumbai Bank
Pravin Darekar Mumbai Bank

By

Published : Aug 5, 2022, 5:05 PM IST

Updated : Aug 5, 2022, 5:14 PM IST

मुंबई -सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ( Mumbai District Central Cooperative Bank ) अखेर पुन्हा एकदा भाजपाचे आमदार प्रविण दरेकर ( Mumbai Co-operative Bank President Pravin Darekar ) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांना धक्कादायकरीत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी विठ्ठल भोसले यांची नियुक्ती झाली होती. शरद पवार आणि मिलिंद नार्वेकर यांनी सूत्रे हलवत दरेकरांना धक्का दिला होता.

प्रतिक्रिया देताना प्रविण दरेकर

दरेकरांवर मजूर म्हणून निवडणूक लढण्याचा आरोप :प्रवीण दरेकर हे मजूर मतदार संघातून निवडणूक लढले होते. ते विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते असताना मजूर कसे असू शकतात? यावरून बराच गदारोळ झाला याबाबत त्यांची चौकशीही करण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले आणि पुन्हा एकदा मुंबई बँकेत सत्तांतराचे नाट्य पाहायला मिळाले. मुंबई बँकेचे विद्यमान अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर पुन्हा बँकेत सत्तापालट होऊन अध्यक्षपदी प्रवीण दरेकर तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे.


'पक्षापलीकडचे राजकारण' :मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रवीण दरेकर म्हणाले की, हे पक्षापलीकडचे राजकारण आहे. आमचा परस्परांमध्ये स्नेह असून आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आता पुन्हा एकदा बँकेच्या विकासासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करता येईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -Amravati District MLA Included Cabinet: अमरावती जिल्ह्यातून 'या' तीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता

Last Updated : Aug 5, 2022, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details