महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitesh Rane : उद्धव ठाकरेंना धोका कोणी दिला?, नितेश राणे म्हणाले, 'एकनाथ शिंदे नाही, तर त्यांच्या...'

शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटाने उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना धोका दिला आहे, अशा बातम्या सतत समोर येत आहेत. त्यावरुन उद्धव ठाकरेंना त्यांच्या घरच्यांनी धोका दिला, असे नितेश राणे यांनी म्हटलं ( Nitesh Rane On Uddhav Thackeray ) आहे.

uddhav thackeray nitesh rane
uddhav thackeray nitesh rane

By

Published : Jul 10, 2022, 7:13 PM IST

Updated : Jul 10, 2022, 7:20 PM IST

मुंबई - राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटाने उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना धोका दिला आहे, अशा बातम्या सतत समोर येत आहेत. परंतु, या बातम्यांच भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी खंडण केलं आहे. उद्धव ठाकरे यांना धोका एकनाथ शिंदे यांनी नाही, तर त्यांच्या घरच्यांनीच दिला आहे, असे स्पष्टीकरण राणे यांनी दिलं ( Nitesh Rane On Uddhav Thackeray ) आहे.

नितेश राणे यांची प्रतिक्रिया

काय म्हणाले नितेश राणे? -नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धोका देत मुख्यमंत्रीपद मिळवलं. अशा बातम्या सर्व ठिकाणी पसरत आहेत. परंतु, वास्तविक उद्धव ठाकरे यांना धोका एकनाथ शिंदे यांनी नाही, तर त्यांच्या घरच्या लोकांनी दिला आहे. त्यांचा सरकारी भाचा (वरूण देसाई) यांनी लोकांच्या घरावर मोर्चे काढले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचार केला, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.

"मिस्टर इंडिया"? -दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी एक ट्विट करत वरुन सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला होता. 'तो माजी सरकारी भाचा, मिस्टर इंडिया झाला आहे का?,' अशी विचारणा ट्विटमध्ये केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्घव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी वाताहत झाली आहे, त्याने सर्व बहुतेक नेत्यांची बोलती बंद झाली आहे. अशातच युवा सेना नेते वरूण देसाई सध्या गप्प आहेत. याच कारणाने नितेश राणे यांनी वरूण देसाई यांच्यावर निशाणा साधत, तो माजी सरकारी भाचा, मिस्टर इंडिया झाला आहे का?, अशी टीका केली होती.

हेही वाचा -Aaditya Thackeray : 'माझ्यावर उगाच खास प्रेम करण्याची...'; अपात्रतेच्या नोटीसीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Last Updated : Jul 10, 2022, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details