मुंबई - राज्यावर कोरोना बरोबरच ओमायक्रॉनचे संकट घोंघावत असताना राज्य (Omicron variant)सरकारकडून कोरोनाची नवीन नियमावलीचा लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे. (Corona Virus)अशा लोकप्रतिनिधींवर मंत्रालयातील पोलिसांनी कारवाई करत नियमांची आठवण करून दिली आहे. मंत्रालयात पोलिसांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्यावर कारवाई केली. चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत. (Mumbai Police Omicron) मंत्रालयातून बाहेर पडताना मास्क नसल्याने पोलिसांनी त्यांना २०० रुपयांचा दंड ठोकला आहे. आमदारांवर कारवाई करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसांचे मंत्रालयात कौतुक होत आहे.
वसुली सरकार
कायदा सर्वांसाठी सारखा आहे. मी कायदा मोडल्याने कारवाई झाली त्यात काही गैर नाही. मी मास्क लावलेला नसल्याने पोलिसांनी माझ्याकडून २०० रुपये घेतले. खरे तर या सरकारमध्ये सर्वत्र जोरदार वसुली सुरु आहे, असा आरोप मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांनी करताना कायद्याच्या वसुलीचे मी कौतुक करतो, असही ते म्हणाले. मी माझ्या मतदारसंघात गरिबांना लुटण्याचे स्टिंग केले होते. या सरकारने त्यात लक्ष घालून दोषींना शिक्षा द्यावी. आजच्या कारवाईचे काही वाईट वाटत नसल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
ओमायक्रोनचे 28 रुग्ण