महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लेनीनग्राड चौकाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतल्या प्रभादेवी भागातील लेनीनग्राड चौकाचे नाव बदलून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुधाकर भालेराव यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. येत्या एक ऑगस्टपासून अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे, या प्रित्यर्थ मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा असे ते म्हणाले.

लेनिनग्राड चौकाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या- भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By

Published : Jul 22, 2019, 9:17 PM IST

मुंबई - मुंबईतल्या प्रभादेवी भागातील लेनीनग्राड चौकाचे नाव बदलून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुधाकर भालेराव यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. येत्या एक ऑगस्टपासून अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे, या प्रित्यर्थ मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा असे ते म्हणाले.

रशियामध्ये साम्यवादी विचार संपला असून, लेनीनग्राडचे महत्त्वही संपले आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून प्रभादेवीतील सयानी रस्त्यावरील लेनिनग्राड चौकाचे अण्णाभाऊ साठे हे नामकरण करावे, अशी मागणी आमदार भालेराव यांनी केली आहे. गिरणगावात लेनिनग्राड चौक असून, या भागात अण्णाभाऊंचे ही काही काळ वास्तव्य होते. गिरणी कामगारांसाठी अण्णांनी लढा उभारला होता. गिरणगावात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारले जावे ही मागणी त्यांनी केली आहे.

लेनिनग्राड चौकाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या- भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून, यासाठी 100 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती भालेराव यांनी यावेळी दिली.
अमरावतीमधल्या बडनेरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका आणि वाचनालय बांधण्यात येणार असून, त्यासाठी राज्य सरकारने २ कोटी रूपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत असल्याचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details