महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीबीवर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिक यांना ड्रग्ज माफियांनी सुपारी दिली आहे काय?, भाजप नेत्याचा आरोप

एनसीबीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे नवाब मलिक म्हणाले होते. मग आता न्यायव्यवस्थेवरचा नवाब मलिक यांचा विश्वास उडाला आहे का? एनसीबीवर आरोप करण्यासाठी ड्रग्ज माफियांकडून मलिक यांनी सुपारी घेतली आहे का? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

atul bhatkhalkar
atul bhatkhalkar

By

Published : Oct 6, 2021, 6:40 PM IST

Updated : Oct 6, 2021, 7:57 PM IST

मुंबई - लॉकडाऊनमध्ये ठाकरे सरकारने सर्वप्रथम दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णयही याच सरकारचा. नशा माफियांसमोर लोटांगण घालण्याची हीच परंपरा कायम ठेवत आणि एक पाऊल पुढे टाकत मंत्री नबाव मलिक यांनी NCB (अमली पदार्थ विरोधी पथक) वर आरोप करून ड्रग्ज माफियांची तळी उचलली आहे का ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

कार्डीलिया क्रूझवर एनसीबीने छापेमारी करून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थांसह अटक केली होती. मलिक यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अतूल भातखळकर म्हणाले की, ठाकरे मंत्रिमंडळाने लखीमपूर घटनेतील शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली चांगली गोष्टी आहे. मात्र महाराष्ट्रात अतिवृष्टीने 71 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मात्र सरकारला विसर पडला. सोनिया गांधींनी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा उपयोग उत्तर प्रदेशच्या राजकारणासाठी करण्याचा आदेश दिला आणि ठाकरे सरकारने तो मानला, अशी टाकी भातखळकर यांनी केली.

अतूल भातखळकर
आर्यन खान यांचे वकीलपत्र दिग्गज कायदेतज्ज्ञ सतीश माने-शिंदे यांच्याकडे आहे. त्यांनी बचावासाठी युक्तिवाद केल्यानंतरही न्यायालयाने NCB ला आर्यन खानची कोठडी दिली. याचे कारण त्याच्याविरुद्ध असलेले ठोस पुरावे होय. जर पुरावे नसते तर त्याला तात्काळ जामीन मिळाला असता. मलिक यांचे आरोप न्यायालयाच्या विश्वासर्हर्तेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहेत.

हे ही वाचा -Cruise Drug Case : अरबाज मर्चंटला ताब्यात घेणारा भाजपचा नेता; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

‘आपला जावई साडे आठ महिने तुरुंगात होता, त्यावेळी मी त्या प्रकरणावर भाष्य केले नाही. कारण माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे’, असे साळसूद उद्गार काढणाऱ्या मलिकांना ठोस पुरावे असल्यामुळेच न्यायालयाने आर्यनला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडीचे आदेश दिले याचा विसर पडलेला दिसतो, अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी केली.

ज्या क्रूझवर NCB ने कारवाई केली तिथे कित्येक लोक होते. त्यापैकी कुणी तरी आर्यन खानसोबत काढलेल्या सेल्फीचे मलिक यांनी विनाकारण भांडवल करू नये. तिथे उपस्थित असलेल्यांपैकी ज्यांचा संबंध नाही त्यांना NCB ने हातही लावला नाही. रेव्ह पार्टीशी संबंधित नसलेल्या व्यक्ति कोणत्या पक्षाच्या होत्या की नव्हत्या त्याची चर्चा कशाला. ठाकरे सरकारला वाटत असेल तर त्यांची चौकशी करावी. संबंध होता त्यापैकी आठ जणांना ताब्यात घेतले आणि त्यातही फक्त तिघांना अटक केली हे लक्षात घ्यावे.

हे ही वाचा -Cruise Drug : कोण आहेत मनिष भानुशाली आणि गोसावी? अनेक नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल

मला जे करता आले नाही ते सर्व माझ्या मुलाने करावे, त्याने सेक्स करावे, ड्रग्ज घ्यावे असे शाहरुखनेच एका मुलाखतीत सांगितले आहे. त्याचा मुलगा तेच करताना पकडला गेला आहे. जे झाले त्याबद्दल शाहरुख मूग गिळून बसला असताना मलिक त्याच्यासाठी कशाला बॅटींग करताहेत. ड्रग्जच्या कारभारात असलेल्या जावयाच्या सांगण्यावरून त्यांनी NCB वर निशाणा साधलाय का? की अन्य ड्रग्ज माफियांनी NCB ला बदनाम करण्यासाठी त्यांना सुपारी दिली? असे प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित करून नवा मलिक यांना या प्रश्नाचा स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Last Updated : Oct 6, 2021, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details