मुंबई -किमान हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळा. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी मंदिरे खुली करा, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
'किमान हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळा' - मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे बातमी
गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात कमी-जास्त प्रमाणात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू सर्व ठिकाणे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, धार्मिक स्थळे उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मंदिरे बंद आहेत. मंदिरे तात्काळ उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपाने मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराबाहेर लाक्षणिक उपोषण केले.
प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजपाचे उपोषण; मंदिरे त्वरित उघडण्याची मागणी
गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात कमी-जास्त प्रमाणात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू सर्व ठिकाणे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, धार्मिक स्थळे उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मंदिरे बंद आहेत. मंदिरे तात्काळ उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपाने मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराबाहेर लाक्षणिक उपोषण केले. 'मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार' अशा घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी दिल्या आहेत.