मुंबई -महाआघाडीने लखीमपूर खेरी येथील दुर्दैवी घटनेचे राजकीय भांडवल करण्यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा मुंबईत पुरेपूर फज्जा उडाला, लोकांनी हा बंद अयशस्वी केला असून कांदिवली व मालाड येथील दुकानदारांना शिवसेनेने पोलिसांच्या मदतीने दमदाटी करून दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला. भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीकडून हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी पाठबळ दिले असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकरी, एसटी कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या करीत असताना लखीमपूरच्या नावाने नक्राश्रू ढाळणाऱ्या भकास आघाडीचा मनसुबा जनतेने ओळखला आणि आजचा बंद पूर्णपणे उधळून लावला. लोकांचा पाठींबा नसल्याने स्वतः पोलिस कार्यकर्त्यांच्या भूमिकेत रस्त्यावर उतरून बंद राबवत असल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी दिसले. गेली दोन वर्षे लॉकडाउनच्या नावाखाली महाराष्ट्र बंद ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सरकार पुरस्कृत बंद पुकारून आपला नाकर्तेपणा पुन्हा सिद्ध केला आहे. पोलीस संरक्षणात अनेक ठिकाणी खासगी वाहने, बेस्ट बसची तोडफोड झाली. पोलीस बळाचा वापर करून केलेल्या या बंद दरम्यान सर्वसामान्यांचे झालेले नुकसान सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांच्या खिशातून भरून काढावे. यासाठी मी स्वतः उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'चा मुंबईत फज्जा- अतुल भातखळकर - अतूल भातखळकर
महाआघाडीने लखीमपूर खेरी येथील दुर्दैवी घटनेचे राजकीय भांडवल करण्यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा मुंबईत पुरेपूर फज्जा उडाला, लोकांनी हा बंद अयशस्वी केला असून कांदिवली व मालाड येथील दुकानदारांना शिवसेनेने पोलिसांच्या मदतीने दमदाटी करून दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला
Atul Bhatkhalkar
हे ही वाचा -Maharashtra Bandh : हे ढोंगी सरकार, हा तर सरकार पुरस्कृत दहशतवादच, देवेंद्र फडणवीसांची टीका
महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंद दरम्यान सरकार व पोलिसांच्या दादागिरी विरोधात रस्त्यावर उतरून व्यापारी आणि दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी हिम्मत देणाऱ्या मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुकही यावेळी केले.