महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुशांतसिंह प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, 'या' भाजपा आमदाराची मागणी - Atul Bhatkhalkar BJP MLA

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी भाजपाने आता आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Sushant Singh suicide case
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण

By

Published : Aug 7, 2020, 9:05 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला ५० दिवस उलटून गेले असतानाही पोलिसांनी साधा एफआयआर देखील दाखल केला नाही. तसेच दिशा सालियनाच्या आत्महत्येनंतर ५० दिवसांनी या संदर्भातील माहिती असल्यास ती आम्हाला द्यावी, असे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी काढले. या दोन्ही प्रकरणांची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांची भुमिकेत हलगर्जीपणाची आहे. त्यामुळे सुशांतसिह आत्महत्या प्रकरणाचा तपास विशिष्ट टप्प्यावर येईपर्यत पोलीस आयुक्त यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया...

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, केंद्र सरकारने सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे दिला आहे. आपण एका माध्यमाला मुलाखतीत व्यक्त होताना असे म्हणाला होतात की, सीबीआय काय इंटरपोलने जरी चौकशी केली तरी आमची काही हरकत नाही. त्यामुळे राज्य सरकार सीबीआय चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आणणार नाही, असा मला विश्वास आहे. त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यास मदतच होईल. या प्रकरणातील पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले जात आहेत, अशा प्रकारची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.

अतुल भातखळकर यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र...

हेही वाचा -माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी घेतली जम्मू काश्मीरच्या उपराज्यपाल पदाची शपथ

पुढे भातखळकर म्हणाले की, राज्य सरकार सुशांतसिंह प्रकरणात कुठलीही लपवाछपवी करत नाही, आम्ही मान्य करतो पण पोलीस हलगर्जीपणा करत आहेत. त्यामुळे दोन्ही पोलीस अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, किमान तपास विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

तसेच, भातखळकर यांनी पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात आपण योग्य ते निर्णय घेतले नाहीत, तर हे सर्व पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी असल्यामुळे मी केंद्रीय गृहमंत्र्याकडे या संदर्भात दाद मागेन, असाही इशारा भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details