महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ashish Shelar On Shiv Sena : शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धी दोष झाला आहे - आशिष शेलार - आशिष शेलार यांची संजय राऊत वर टीका

शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धी दोष झाला आहे. तुमचा जन्म होण्याआधीपासून हे आंदोलन सुरू होते असे सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अशोक सिंगल, आचार्य धर्मेंद्रजी ही नाव तर यांना माहित आहेत का? उगाच कोणाचतरी श्रेय घेण्याच्या भानगडीत ही गडबड करू नका? आपली तोंड बंद करावीत असा सल्लाही त्यांनी शिवसेना नेत्यांना ( Ashish Shelar On Shiv Sena ) दिला आहे.

Ashish shelar on Sanjay raut
आशिष शेलार संजय राऊत

By

Published : May 2, 2022, 5:53 PM IST

मुंबई -सध्या राज्यात भोंगा व बाबरी मशीद यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशिदीविषयी बोलताना त्याचा इतिहास पाहण्याचा सल्ला भाजप नेत्यांना दिला. त्यावर भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी सडकून टीका करताना शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला ( Ashish Shelar On Shiv Sena ) आहे, असे म्हटले आहे.

उगाच श्रेय घेण्याच्या भानगडीत गडबड करू नका? -यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धी दोष झाला आहे. तुमचा जन्म होण्याआधीपासून हे आंदोलन सुरू होते असे सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अशोक सिंगल, आचार्य धर्मेंद्रजी ही नाव तर यांना माहित आहेत का? उगाच कोणाचतरी श्रेय घेण्याच्या भानगडीत ही गडबड करू नका? आपली तोंड बंद करावीत असा सल्लाही त्यांनी शिवसेना नेत्यांना दिला ( Ashish shelar on Sanjay raut ) आहे.

आता काँग्रेसची आंदोलने शांत का? -ज्या पद्धतीने पेट्रोल-डिझेलच्या करात सवलत केंद्राने दिली त्यापासून राज्य सरकार पळ काढत आहे. केंद्र सरकार कर कमी करत नाही म्हणून आंदोलन केली जात होती. आता केंद्र सरकारने कर कमी केल्याने त्याचबरोबर देशात 22 राज्यांनी कर कमी केले आहेत. महाराष्ट्राच्या शेजारची राज्य दीव- दमण, गोवा, गुजरात यांनी सुद्धा कर कमी केला. परंतु महाराष्ट्रात कर कमी केला जात नाही. त्या वेळी आंदोलन करणारी काँग्रेस आता मात्र स्वतःच्या सरकारला वेट कमी करायला का संगत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देशाचे पंतप्रधान हे रशिया कडून क्रुड ऑईल घेत आहेत तसेच देशाच्या हिताचे काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांना इतिहासच माहित नाही! -बाबरी मशीद बाबत बाळासाहेब काय म्हणाले त्यावर मी बोलणार नाही. कारण बाळासाहेब वेगळे होते. आम्ही त्यांना मानणारे आहोत. आम्ही शिस्तप्रिय पक्षातील लोक आहोत. त्यांच्यावर टीका करणार नाही. परंतु संजय राऊत यांचा काय संबंध. इतिहास बदलता येत नाही. इतिहास बदलण्याची ताकद संजय राऊत यांच्यामध्ये नाही आहे. मुळात त्यांना इतिहासच माहीत नाही आहे. असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला. बाळासाहेब कसे होते यावर टीकाटिपणी मी करणार नाही. आमच्यासाठी ते कालही, आजही आणि उद्याही वंदनीय असतील. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केलं ते धूर्त आहेत म्हणून आमची फसगत झाली. आम्ही त्यांना भावासारख मानलं होतं. परंतु त्यांनी स्वतः मान्य केलं कि ते धूर्त आहेत. राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पडल्या कारणामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी टाइमिंग दिसत आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांची भाषणेही बघावी लागतील? - काल औरंगाबादच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, याविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, चिथावणीखोर भाषणावर कारवाई करायची असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भाषणे बघावी लागतील. सर्वच पक्षांना आपल मत मांडण्याचा अधिकार आहे. कुठल्याही सूडबुद्धीने केलेल्या कारवाईला आमचा विरोध असेल. भारतीय जनता पक्षावर तुटून पडा, हे जे उद्धव ठाकरे म्हणाले होते याचा अर्थ काय होतो? पदावर बसलेल्या व्यक्तीने जर तुटून पडा, हाणून पाडा, हे शब्द वापरले असतील तर याची चौकशी होणार आहे का? असे सांगत, टोमणे मारणे कुजकट बोलणे मुख्यमंत्रीपदावर बसल्यावर तिला शोभत नाही असेही आशिष शेलार म्हणाले.

भाषणे सर्वच पक्षांची बघावी लागतील. कायद्याला कायद्याचे काम करू द्या. कोणाला टार्गेट करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका. हनुमान चालीसा म्हटल्यावर राजद्रोह होतो. या सर्वामध्ये बोटचेपी भूमिका सरकारची आहे. आता आरती करणार म्हणून तुम्ही जर नोटीस देणार असाल तर उद्या परवा शिवाजी पार्क ला नमाज पडायला सुद्धा तुम्ही परवानगी द्द्याल का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच ओवेसी ज्या पद्धतीची भाषण करतात त्यावर न्यायालय गप्प का? त्यावर न्यायालयाने लक्ष देण्याची वेळ आली आहे. असेही शेलार म्हणाले.

हेही वाचा -Ajit Pawar On Raj Thackeray : अजित पवारांनी केली राज ठाकरे यांची नक्कल! म्हणाले, काय ते एकदाच....

ABOUT THE AUTHOR

...view details