मुंबई -महाराष्ट्रातील ठाकरे सरकार या बेकायदेशीर, अनधिकृत, बालिश, पोरकट असून कधी नव्हे तेवढे मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. पोलिसांना बदनाम करून त्यांना आपल्या बंगल्यावरील 'कांचा' करायचे आहे काय? असा खरमरीत सवाल करीत भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय आहे प्रकरण? - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात भाजपाचे पदाधिकारी दिव्या ढोले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाहीच, उलट ढोले यांचे अश्लील, लज्जास्पद आणि बेअब्रू करणारे मोर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिव्या ढोले यांना देण्यात येत आहे. याप्रकरणी त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार केली, त्याचीही दखल घेऊन न्याय मिळत नाहीत. म्हणून या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहनही केले आहे. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने या प्रकरणी आज भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये दिव्या ढोले यांच्यावर झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती माध्यमांसमोर उघड केली.