महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनी देवेंद्र फडणवीस देणार 'बुस्टर डोस'! - आशिष शेलार - 1 मेला भाजपाचा कार्यक्रम

कोरोना नंतर भव्य दिव्य स्वरूपात भाजपातर्फे महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day ) आणि कामगार दिन साजरा केला जाणार आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील सोमैया मैदानावर हा रंगारंग कार्यक्रम ( BJP Maharashtra Day Rally ) आहे. यात भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "बुस्टर डोस" सभा होणार आहे.

Maharashtra Day
आशिष शेलार

By

Published : Apr 28, 2022, 12:48 PM IST

मुंबई -महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, विविध रंगांचे, सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचे समग्र दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासह 1 मेला महाराष्ट्र दिनी ( Maharashtra Day ) भाजपाची मुंबईत " बुस्टर डोस" सभा होणार ( BJP Maharashtra Day Rally ) आहे, अशी माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार ( BJP MLA Ashish Shelar on BJP Maharashtra Day Rally ) यांनी आज दिली. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस देणार बूस्टर डोस! -कोरोना नंतर भव्य दिव्य स्वरूपात भाजपातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जाणार आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील सोमैया मैदानावर हा रंगारंग कार्यक्रम आहे. यात भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "बुस्टर डोस" सभा होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे होणारे तडाखेबाज भाषण म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांना "बुस्टर डोस" असेल तर महाविकास आघाडीला "डोस" असेल, असे आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.

सभेसाठी परवानग्या मागितल्या -गेल्या काही दिवसात मेट्रोच्या पत्र्याच्या आड लपून भाजपाच्या पोलखोल सभांवर अती "विराट" म्हणजे एक दोन कार्यकर्ते दगड मारीत आहेत, त्याचा समाचार घेऊन मुंबईसह राज्याच्या विषयांवर सत्ताधारी पक्षाला "डोस" देणारी ही सभा असेल असेही आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. सध्या कुणी १ मे च्या सभेसाठी परवानगी मागत आहे, तर कोणी १५ मे ला मुंबईत सभा घेण्याचे सांगत आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसे प्रमुख राज ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर ही टोमणा लगावला आहे.

आता गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का? -कार्यक्रमात एक तलवार दाखवली म्हणून मोहीत भारतीय यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर आता महाराष्ट्रात ज्या पध्दतीने तलवारीचा साठा सापडलाय त्यावर आता राज्याच्या गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का? असा सवाल महाराष्ट्र करीत आहे. राज्यातील सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असताना दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी हे षडयंत्र तर नाही ना? अशी शंका ही आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना उपस्थितीत केली.

हेही वाचा -Raj Thackeray's Tweet : महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'- राज ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details