मुंबई -पालिका म्हणते की आम्ही ग्लोबल टेंडर काढणार आहोत, तर दुसरीकडे राज्य सरकार ग्लोबल टेंडरच्या मुद्द्यावर केंद्राची परवानगी लागत असल्याचं सांगत आहे. याच मुद्द्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांना प्रश्न विचारला असता,. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. तसेच कोणताही अभ्यास न करता महाविकास आघाडी सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचे शेलार म्हणाले.
हेही वाचा -राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती
दरम्यान, दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडीचा कार्यक्रम मागच्या एक वर्षापासून सुरू असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली. जनतेची दिशाभूल करणार्या नेत्यांवर क्रिमिनल ऑफेन्स दाखल करावा, अशी मागणीही शेलार यांनी केली.
आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावरही टीका केली. त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेक्रेटरीचा हवाला देत, लशी सर्वाधिक जालनाकडे कशा काय गेल्या? मला शंका आहे की या मुंबईच्या वाट्याच्या लशी जालनाकडे पळवल्या असल्याचे शेलार यांनी सांगितले.
हेही वाचा -'तिजोरीत खडखडाट.. तरीही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी 6 कोटींचा खर्च कशाला?'