मुंबई : भाजपा नेते आमदार आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी ( Ashish Shelar And His Family Threatened ) देण्यात आली आहे. याप्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना ( Ashish Shelar Letter Mumbai Police Commissioner ) काल पत्र लिहून तक्रार दिली आहे. दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमाकांवरुन ही धमकी दिल्याची माहिती मिळत आहे.
आमदार आशिष शेलार यांना सातत्याने दोन वेगवेगळ्या क्रमांकावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, एक अज्ञात व्यक्तीने त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहले असून, दोन्ही क्रमाकांची माहिती देऊन तपास करण्याची विनंती केली आहे. तसेच, याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून मिळालेल्या धमकीची माहिती आशिष शेलार ( Ashish Shelar Letter Home Minister ) यांनी दिली आहे.