मुंबई मुंबई महानगरपालिका निवडणूक BMC Election 2022 पार्श्वभूमीवर भाजपाने मिशन १३४ काम सुरू BJP Mission 134 for BMC Election 2022 केले आहे. येत्या निवडणुकीत पालिकेवर भाजपाचा महापौर निवडून आणावा यासाठी भाजपाने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच शिवसेनेला घेरण्याची रणनिती BJP Target BMC Election 2022 आखली आहे. यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
मित्र पक्ष झाले वैरीमुंबई महापालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बोलले जाते. पालिकेचा अर्थसंकल्प ४५ हजार कोटींचा आहे. यामुळे पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत असतात. पालिकेवर १९९२ मध्ये काँग्रेसचा महापौर होता. त्यानंतर मात्र सतत शिवसेनेचा महापौर निवडून येत आहे. या कालावधीत भाजपा हा शिवसेनेचा मित्र पक्ष होता. २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यावर भाजपकडून पालिकेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. २०१७ च्या निवडणुकीत मित्र पक्ष असलेले शिवसेना भाजपा एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले. २०१७ च्या निवडणुकीच्या आधी शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचे आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वी वर्षभर शिवसेनेवर आरोप सुरू होते.
शिवसेनेला संधीएकीकडे शिवसेनेवर आरोप सुरू असताना भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेत वॉर्ड पुनर्ररचना केली. याचा परिणाम म्हणून भाजपाचे ३२ वरून ८२ नगरसेवक निवडून आले. भाजपाच्या ५० जागा पालिकेत वाढल्या. शिवसेना ८४ तर भाजपाकडे ८२ नगरसेवक होते. मात्र भाजपाने कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे जाहिर करून शिवसेनेला महापौर बनवण्याची संधी दिली. भाजपाचा असलेला धोका पाहून मनसे, अपक्ष अशा नगरसेवकांना पक्षात घेऊन शिवसेनेने आपले महापौर पद शाबूत ठेवले.