मुंबई - माफी मागेपर्यंत राणा दाम्पत्याला जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राणा दाम्पत्याला सुरक्षित पणे जाऊ द्या नाहीतर मी त्यांना घेऊन जाईल, बघतो कोण अडवते, असे आव्हान राणेंनी महाविकास आघाडीला दिले ( Narayan Rane On Rana controversy ) आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( Mla Ravi Rana ) यांनी मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठण ( Matoshree Front Hanuman Chalisa Recite ) मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र, राणा दाम्पत्याने माफी मागेपर्यंत त्यांना जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. राणा दाम्पत्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यांना सरकारने सुरक्षितपणे बाहेर काढावे. अन्यथा एक तासात मी येईल आणि बाहेर काढेल, असा इशारा महाविकास आघाडीला दिला आहे.
सुशांत सिंग आणि दिशा सालियनचा खूनच -नारायण राणे म्हणाले की, सुशांत सिंगच्या घराबाहेर एका मंत्र्याची गाडी उभी होती. दिशा सालीयानवर पार्टीमध्येच अत्याचार झाला. तिची हत्या कोणी केली याचा तपास अद्याप होत नाही. मात्र, त्याचे साक्षीदार आहेत, असा दावाही राणेंनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांवर केली टीका -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सभागृहात बसता येत नाही, बोलता येत नाही, मंत्रालयात जाता येत नाही, कॅबिनेटमध्ये बसता येत नाही हे कसले मुख्यमंत्री?. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा परंपरेत हा कलंक आहे. त्यांच्या हिंदुत्वाचे काय झाले. त्यांनी हिंदुत्वाला मूठमाती दिली. मातोश्रीबाहेर 235 तर राणांच्या घराबाहेर सव्वाशे शिवसैनिक हीच का शिवसेनेची ताकद, असा सवालही राणेंनी केला आहे.
राऊतांना मीच खासदार केले - दरम्यान, संजय राऊतांवर नारायण राणेंनी जोरदार टीका केली आहे. राऊतांना आपणच खासदार केल्याचे राणेंनी सांगितले. राऊत यांची ही कागदपत्रे खोटी असल्याचे सांगत त्यांच्या कागदपत्रांना आलेले ऑब्जेक्शन आपण सांभाळून घेतले, असेही राणेंनी म्हटले आहे.
कुठल्याही क्षणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट - राज्यातील कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागावी अशीच परिस्थिती दावा राणेंनी केला. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्याचे कारण स्पष्ट करावे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला सरकारने परवानगी द्यायला हवी, असेही नारायण राणेंनी सांगितले आहे.
हेही वाचा -Devendra Fadnavis On Rana controversy : राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेते बनवण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे काय, फडणवीस यांचा सवाल