मुंबई - भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वात शनिवारी वसंत स्मुती कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत जे. पी. नड्डा यांनी राज्यात निवडणूक स्वबळावर लढण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांचा विचार घेतल्याची माहिती मिळते आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊन आचारसंहिता लागू होणार असल्याने भाजप व शिवसेना यांच्यातील युतीच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची पकड मजबूत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आप-आपले उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या बैठकीत भाजपच्या पदाधिकारी,आमदार आणि खासदारांची आगामी निवडणुकी संदर्भात काय भूमिका असेल यावर नड्डा आणि गोयल यांनी मार्गदर्शन केले.