महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सरकारी खर्चाने खासगी विमानप्रवास करणाऱ्या नितीन राऊत यांना हटवा' - vishwas pathak news

मुख्यमंत्र्यांनी राऊत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपा माध्यम विभागप्रमुख व ऊर्जा विभागाचे माजी संचालक विश्वास पाठक यांनी केली.

BJP media department head
BJP media department head

By

Published : Mar 16, 2021, 4:52 PM IST

Updated : Mar 16, 2021, 5:04 PM IST

मुंबई -ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत लॉकडाऊन काळात बेकायदा पद्धतीने खासगी कामासाठी विमान प्रवास केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राऊत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपा माध्यम विभागप्रमुख व ऊर्जा विभागाचे माजी संचालक विश्वास पाठक यांनी केली.

माहिती अधिकारातून उघड

सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल आयपीसीअंतर्गत 406, 409अन्वये नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. माध्यमांशी सवांद साधताना ते म्हणाले, की लॉकडाऊनकाळात राऊत यांनी 12 जून, 2 जुलै, 6 जुलै रोजी मुंबई-नागपूर, 9 जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर, दिल्ली असा विमान प्रवास केल्याचे माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीत 'महानिर्मिती'ने मान्य केले आहे. हा खर्च ऊर्जा खात्याच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने केला आहे.

'सर्व नियम बसवले धाब्यावर'

मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही अशापद्धतीने खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसाचा वीजपुरवठा तोडणाऱ्या महावितरणला आपल्या मंत्र्यांच्या खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाचा खर्च करण्यासाठी मात्र पैसा आहे, हे आश्चर्यजनक आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. राऊत यांनी सर्व नियम धाब्यावर बसवीत हा विमान प्रवास केला असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना तातडीने मंत्रीमंडळातून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली.

Last Updated : Mar 16, 2021, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details