ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप, मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला मोठा धक्का - मुंबई महामंत्री भाजप सहभागी

भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebs Shiv Sena ) या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आता भाजपचेदेखील नेते फोडायला सुरुवात केली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप,
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप,
author img

By

Published : Oct 19, 2022, 7:12 AM IST

मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या ( Politics BMC election ) आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक माजी नगरसेवक नेतेमंडळी या पक्षातून त्या पक्षात या जाताना पाहायला मिळणार आहेत. मात्र शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपाशी युती करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते फोडले. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा भाजपकडेदेखील वळविल्याचे दिसत आहे.

भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebs Shiv Sena ) या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आता भाजपचेदेखील नेते फोडायला सुरुवात केली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


फोडाफोडीचे राजकारण नव्या टोकालाबाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राम यादव ( Ram Yadav and Rekha Yadav ) आणि रेखा यादव यांनी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी ( BJP MLA Manisha Chaudhary ) यांच्यावर यादव दांपत्याने राजकीय कोंडी करत असल्याचा आरोपही केला. मुंबई महानगरपालिक निवडणुकीच्या तोंडावर राम यादव आणि व्यथा यादव यांचा भारतीय जनता पक्षातून बाळासाहेबांचे शिवसेना पक्षात जाण्याच्या निर्णयाला भाजपाला मोठा धक्का समजला जात आहे. तसेच ( BJP Mahamantri joined shinde group ) बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाने इतर पक्षाचे नेतेमंडळी फोडत असताना आता भाजपचे नेते मंडळी देखील फोडायला सुरुवात केली आहे, अशी चर्चादेखील सुरू झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details