मुंबई- शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र, सत्तास्थापेनबाबत काहीच बोलणे झाले नसल्याचे पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातच सत्तास्थापनेबाबत मतभेद असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले आहे.
माधव भंडारी, भाजप प्रवक्ते हेही वाचा -शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार
राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असून राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे एकत्र येत सत्ता स्थापन करतील अशी चिन्हे दिसत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. मात्र, या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, राज्यातील स्थितीबाबत चर्चा केली, असे पत्रकार परिषदेत वक्तव्य केले. यामुळे राज्यातील सत्तेचा पेच आणखीनच वाढलेला आहे.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील सत्तास्थापनेच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी टीका करताना राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षातच मतभेद असल्यामुळे शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावरून स्पष्ट होत असून त्यांचे राज्यातील सत्तास्थापनेतील नेमके धोरण काय आहे, हेच स्पष्ट होत नसल्याचे माधव भंडारी म्हणाले.