महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवारांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून भाजप नेत्यांकडून प्रार्थना - चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक ट्विट केले आहे.

sharad pawar on health
sharad pawar on health

By

Published : Mar 29, 2021, 6:59 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवारांची आता प्रकृती स्थिर असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली होती. सर्वच राजकीय नेतेमंडळी शरद पवारांची प्रकृती स्थिर होण्यासाठी प्रार्थना करु लागली आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील शरद पवार यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे. शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावेत असे भावनिक ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेले ट्विट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे की, शरद पवार साहेबांची प्रकृती अचानक बिघडल्याचे वृत्त कळले. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांनी लवकरात लवकर रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे. असे भावनिक ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट
देवेंद्र फडणवीसांनीही केली प्रार्थना -विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थाबद्दल कळले त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details