मुंबई - मुंबई महापालिकेच्या ( BMC ) स्थायी समितीमध्ये सदस्यांना बोलू दिले जात नाही. प्रस्तावांवर चर्चा केली जात नाही. चर्चा ना करताच प्रस्ताव घाई गडबडीने मंजूर केले जातात. यामुळे भाजपाकडून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर अविश्वास ठराव ( standing committee chairman against no confidence motion ) आणण्यात आल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.भाजपने मुंबईकरांच्या विकासाच्या आड न येता विकासकामांच्या प्रस्तावाना पाठिंबा द्यावा. राजकारण करून मुंबईकरांचा विकास रोखून धरून ठेवू नये असा प्रतिउत्तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहे.
यासाठी आणला अविश्वास ठराव -
स्थायी समितीच्या सभेत महत्वाच्या विषयावर, आर्थिक भ्रष्टाचारावर, कोविड काळातील गैरव्यवहारावर, शालेय विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतील भ्रष्टाचारावर, पोयसर नदी मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावातील भ्रष्टाचारावर सदस्यांना बोलू न देणे, घाईघाईत प्रस्ताव मंजूर करणे तसेच प्रस्तावास तीन सुस्पष्ट दिवस झाले नसताना प्रस्ताव विचारात घेणे या सर्व कायदेविसंगत अनियमितता व लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या वर्तवणूकीबद्दल अविश्वास आणला असल्याची माहिती भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. तसेच आयकर खात्याच्या अहवालानुसार बृहन्मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष, यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचाराद्वारे जमा केलेले काळे धन सफेद करण्यासाठी पैशाची अवैध अफरातफर केल्याचे निदर्शनास आल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.