मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो-3 चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्या विरोधात भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांनी आरेतील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याची केलेली घोषणा फसवी असल्याचा दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या कारशेड हलवण्याच्या निर्णयावरून राज्याची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एका समितीने केलेल्या निष्कर्षानुसार मेट्रो-3 च्या कारशेडसाठी केवळ आरेतील जागा योग्य असल्याचे म्हटले आहे. शिवाय कांजूरमार्ग येथील जागा जाहीर करण्यात आली आहे ती जागा योग्य नसून त्यासंदर्भात अनेक वाद असल्याचा दावाही भातखळकर यांनी केला आहे.