मुंबई- राज्य सरकारने वेतवनाढीचा निर्णय घेतल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते आणि परिवहन मंत्री यांच्यात चर्चा झाली. कर्मचाऱ्यांशी बोलून उद्या निर्णय जाहीर करू, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) यांनी दिली. यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांचा आज रात्रीही आझाद मैदानातच मुक्काम असणार आहे.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण (ST employees strike in Azad Maidan) आणि इतर मागण्यांबाबत २७ ऑक्टोबरपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गेले दोन आठवडे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले जात आहे. राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पगार वाढ देण्याची तसेच विलीनीकरणाबत न्यायालयाने नियुक्त केलेली समितीने दिलेला निर्णय सरकार मान्य करेल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab on ST employees salary hike) यांनी दिली. आझाद मैदानात आज रात्रभर कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलले. त्यानंतर उद्या निर्णय जाहीर करू अशी त्यांनी माहिती दिली आहे.