मुंबई- भाजपकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानामुळे आता शिवसेना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या गुजराती मतदारांना साद घालायचे ठरवत, गुजराती बॅनर करत गुजराती मेळावा आयोजित केला आहे. यावर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निवडणूक पाहून सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांना लोकांनी ओळखलंय अशी टीका केली आहे.
..सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या शिवसेनेला लोकांनी ओळखलंय - राम कदम
शिवसेना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या गुजराती मतदारांना साद घालायचे ठरवत, गुजराती बॅनर करत गुजराती मेळावा आयोजित केला आहे. यावर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निवडणूक पाहून सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांना लोकांनी ओळखलंय अशी टीका केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मुंबईत ही मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती मिळत आहे. 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी मेळावा मुंबईत आयोजित केला आहे.