मुंबई -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात राम कदम यांनी मोर्चा काढला.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे कोलकाता दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यातील एका कारवर विटांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्र भाजपातही उमटले. राज्यातील भाजपा नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतळा जाळण्यात आला.