मुंबई -विधान परिषद निवडणुकीत मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Nawab Malik and former Home Minister Anil Deshmukh ) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मतदान करता येणार नाही, असा निकाल दिला आहे. या निकालामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत आता महा चमत्कार होईल, असा दावाही विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर ( Legislative Council Opposition Leader Pravin Darekar ) यांनी केला आहे. तर हा निकाल भाजपाच्या विजयासाठी शुभसंकेत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी दिली आहे.
Vidhan Parishad Election : आता महाविकास आघाडी विरोधात महा चमत्कार होईल - प्रविण दरेकर - विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर
नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Nawab Malik and former Home Minister Anil Deshmukh ) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मतदान करता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत आता महा चमत्कार होईल, असा दावाही विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर ( Legislative Council Opposition Leader Pravin Darekar ) यांनी केला आहे. तर हा निकाल भाजपाच्या विजयासाठी शुभसंकेत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी दिली आहे.
![Vidhan Parishad Election : आता महाविकास आघाडी विरोधात महा चमत्कार होईल - प्रविण दरेकर प्रविण दरेकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15585884-thumbnail-3x2-a.jpg)
प्रविण दरेकर
प्रतिक्रिया देतांना भाजपा नेते प्रविण दरेकर
'चमत्कारानंतर आता महान चमत्कार होईल' :नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय हा आमच्यासाठी दिलासादायक आहे. तर महाविकास आघाडीचा बुडत्याचा पाय खोलात, असा टोला विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी लगावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करून दाखवला होता, मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत आता महा चमत्कार होईल, असा दावाही दरेकर यांनी केला आहे.
Last Updated : Jun 17, 2022, 4:12 PM IST