मुंबई - राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचे आव्हान दिल्यानंतर आज दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर ( Mohit kamboj car attack Matoshri Mumbai ) तणावाचे वातावरण आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. या तणावाच्या परिस्थितीत मोहित कंबोज ( Pravin Darekar on Mohit Kamboj car attack ) दाखल झाले व आपल्या गाडीतून उतरले. याच वेळी त्यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. या प्रकरणावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar warn cm Thackeray ) यांनी प्रतिक्रिया दिली असून, 'आपल्याकडे अरे ला कारे म्हटले जाते, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सरकार व पोलीस जबाबदार असतील' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा -Shivsainik Attack Mohit Kamboj Car : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला
दरेकर यांनी काय म्हटले ? - अशा प्रकारचा हल्ला होणे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. कारण ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्या पक्षाचे प्रमुख आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण होते हे लज्जास्पद आहे. यावरून महाराष्ट्र कुठल्या दिशेने चालला आहे हे दिसून येते. आपल्या महाराष्ट्रात जशी राजकीय संस्कृती आहे तसेच आपल्याकडे आरेला कारे केले जाते. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा. पोलिसांसमोर असे हल्ले होत आहेत ज्याला गृहखात्याने देखील गांभीर्याने घ्यावे. अन्यथा होणार्या परिणामांना मुख्यमंत्री, राज्याचे गृहखाते व पोलीस जबाबदार असतील, असे इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.