महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या बॉम्बस्फोटानंतर मलिकांचा स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न - प्रवीण दरेकर - प्रवीण दरेकरांची मलिकांवर टीका

नवाब मलिक यांच्या उत्तरालाच प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेत मलिकांचा हा बचावासाठी केविलवाणा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. मलिकांनी कानावर हात ठेवले आहेत किंवा कानात बोळे घातले आहेत. मलिक म्हणतात कवडीमोल भावाने जमीन घेतली नाही, तर किती भावाने घेतली हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही दरेकर यांनी सांगितले आहे.

दरेकर
दरेकर

By

Published : Nov 9, 2021, 4:05 PM IST

Updated : Nov 9, 2021, 4:41 PM IST

मुंबई -दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या संदर्भात एक मोठा बॉम्ब स्फोट केला. सरदार शहा वली खान व सलीम पटेल या अंडरवर्ल्ड गुन्हेगारांशी मलिक यांचे संबंध होते व त्यांच्याकडून मलिकांनी स्वस्तात जमीन सुद्धा विकत घेतली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देते हा फुस्का स्फोट असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे. मालिकांच्या या उत्तरावर स्पष्टीकरण देताना विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मलिकांचा स्वतःला वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.

विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर

'चौकशीअंती दूध का दूध पाणी का पाणी होईल'

नवाब मलिक यांच्या उत्तरालाच प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेत मलिकांचा हा बचावासाठी केविलवाणा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. मलिकांनी कानावर हात ठेवले आहेत किंवा कानात बोळे घातले आहेत. मलिक म्हणतात कवडीमोल भावाने जमीन घेतली नाही, तर किती भावाने घेतली हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही दरेकर यांनी सांगितले आहे. सरदार शहा वली खान व सलीम पटेल यांच्याशी त्यांचा संबंध आहे हे स्पष्ट आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी जमिनीचा व्यवहार केला आहे. एग्रीमेंट केलेल आहे, रजिस्ट्रेशन केल आहे, ते खोटे आहे का? हे ते सांगू शकत नाहीत. मूळ प्रश्नावर ते बोलत नाहीत. जागेसंबंधी सुद्धा ते काही बोलत नाहीत. उद्या सर्व तपास यंत्रणा कागदपत्रांची पूर्तता करतील तेव्हा मलिक यांना चौकशीला सामोरे जावेच लागणार आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. फक्त चॅनलच्या माध्यमातून मूळ प्रश्नापासून जनतेची दिशाभूल करण्याची सवय त्यांना झाली आहे, असे सांगत जेव्हा ते चौकशीला सामोरे जातील तेव्हा दूध का दूध और पाणी का पाणी होईल, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

फडणवीसांचा मालिकांवर अंडरवर्ल्ड बॉम्ब

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागलेल्या आहेत. सत्तापक्ष व विरोधक यांच्यात मागील महिन्याभरापासून तूतू मैमै सुरू झाली आहे. मागील महिन्यापासून दिवाळी पूर्वी मंत्री नवाब मलिक यांच्याकडून लावण्यात आलेल्या आरोपांना दिवाळीनंतर उत्तर देण्याचे काम करणार असल्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्याप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप करत मलिकांचे सरदार शहा वली खान व सलीम पटेल या अंडरवर्ल्ड गुन्हेगारांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. सरदार शहा वली खान व सलीम पटेल ह्या दोन व्यक्ती ज्यांच्याशी नवाब मलिकांनी जमिनीचा व्यवहार सुद्धा केला आहे, असा आरोप करत एक मोठा बॉम्ब फोडला.

'फडणवीसांचे फटाके भिजलेले'

नवाब मलिक यांनी मात्र देवेंद्र फडणीस यांच्याकडून लावण्यात आलेल्या आरोपाला नकार दिला आहे. देवेंद्र फडणवीस दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार होते. परंतु त्यांचे फटाके भिजलेले आहेत, असे सांगून त्यामध्ये काही तथ्य नाही आहे. मी कोणतीही जमीन कवडीमोलाने विकत घेतली नाही, असा बचावात्मक पवित्रा नवाब मलिक यांनी घेतला आहे.

हेही वाचा -उद्या सकाळी दहा वाजता फडणवीसांचं अंडरवर्ल्डशी असलेलं नात उघड करणार - नवाब मलिक

Last Updated : Nov 9, 2021, 4:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details