मुंबई -पंकजा गोपीनाथ मुंडे मराठवाड्यातील आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. पंकजा मुंडे यांना पक्षातून डावलले जात असल्याचा अनुभव सातत्याने येतो आहे. राज्यसभेसाठी इच्छुक असणाऱ्या पंकजा यांना डावलण्यात आल्यानंतर आता त्यांना विधान परिषदेत नक्की उमेदवारी मिळेल असे वाटत होते. आणि तशी इच्छा स्वतः पंकजा यांनी व्यक्त केली होती तरीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे पंकजा यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा नाराजी आहे.
काय आहेत कारणे?पंकजा मुंडे यांची मतदारसंघावरील पकड कमी झाली आहे. पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवाला सामोरे जावे लागले होते. पंकजा मुंडे यांनी नेहमीच आक्रमक नेतृत्व म्हणून समोर आल्या. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा पर्याय म्हणून एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांची नावे जोरदार चर्चेत होती. त्यामुळे आपल्या त्यांनी स्पर्धकांना देवेंद्र फडणवीस यांनी अलगद बाजूला केले. पंकजा मुंडे यांना कोणत्याही पद्धतीची ताकद मिळणार नाही, यासाठी फडणवीस नेहमी प्रयत्नशील असल्याची चर्चा पंकजा समर्थकांमध्ये नेहमी असते. असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
ओबीसी नेतृत्व भक्कम व्हायला नको? -गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते मानले जात होते त्यांचे राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. ओबीसी समाज आजही मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच पंकजा मुंडे यांचे नेतृत्व अधिक भक्कम व्हायला नको असा प्रयत्न पक्षांतर्गत सुरू असल्याची प्रतिक्रिया नाही. एका माजी मंत्र्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली. असेही राजकीय विश्लेषकांनी सांगितले.