महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जनतेच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी - पंकजा मुंडे

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) म्हणाल्या, की ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो. ओबीसीमधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे. मागासवर्गीय आयोगाची स्थापना सक्षमपणे करून इम्परिकल डेटा तयार करणे महत्त्वाचे आहे.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

By

Published : Nov 23, 2021, 4:32 PM IST

Updated : Nov 23, 2021, 5:39 PM IST

मुंबई - दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेले ठाकरे सरकार जनतेच्या प्रश्नावर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारमधील मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकले आहेत. त्या सरकारकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते, असा घणाघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.


भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, की ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो. ओबीसीमधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे. मागासवर्गीय आयोगाची स्थापना सक्षमपणे करून इम्परिकल डेटा तयार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आयोगाला निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. प्रत्येक गोष्ट व प्रत्येक निर्णय करण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. मग हे सरकार काय करणार? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.

जनतेच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी

हेही वाचा-'पंतप्रधानांकडे लोकसभेत बहुमत आहे, पण लोकांचा विश्वास गमावला' - शिवसेना

शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सरकार

पुढे भाजप नेत्या मुंडे (Pankaja Munde Slammed Mahavikas Aghadi) म्हणाल्या, की महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे. कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी याचा लोकांवर परिणाम होत आहे. यासाठी आम्ही स्वतः बांधावर गेलो. प्रधानमंत्री कृषी योजना निधी वगळता कुठलीही मदत शेतकऱ्याला भेटली नाही आहे. अशा परिस्थितीत वीज बिलाची सक्तीने वसुली केली जात आहे. याबाबत आंदोलन छेडले जाईल, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. पण शाळांनी वीज बिल भरले नसल्याकारणाने वीज कनेक्शन तोडून टाकण्यात आले आहेत. विद्यार्थी अंधारात आहेत. पण दोन मंत्र्यांत कुठलाही संवाद नाही, असा आरोपही पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.

हेही वाचा-Legislative Council elections : शिवसेनेकडून माजी आमदार सुनिल शिंदे उमेदवारी अर्ज भरणार

सरकारने महत्त्वाच्या योजना बंद केल्या-

केंद्राने इंधन करात कपात केली आहे. पण महाराष्ट्र सरकारने अजून मदत केली नाही. एसटी कामगारांचा प्रश्न कठीण (Pankaja Munde over ST strike) आहे. पण त्याबाबत चर्चा करायला सरकार तयार नाही. त्यांच्या प्रश्नाची दखल घ्यायला कोणी तयार नाही. वीजबिल वसुली बंद करा, असे सांगितल्यावर या सरकारने वीज बंद केली. वॉटर ग्रीड मराठवाडा, जलयुक्त शिवारसारख्या योजना बंद केल्या आहेत. महाराष्ट्रभर रान उठवून सरकारकडून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा-पुजा ददलानी आज एसआयटीसमोर हजर राहण्याची शक्यता... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

Last Updated : Nov 23, 2021, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details