मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबई महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. परिणामी राज्यातील आरोग्य व्यवस्था ही वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी अपुरी आहे. या सगळ्या प्रकरणावर भाजपने या महाविकास आघाडी सरकारला घेरलेले असताना भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठल्याची टीका पत्रकार परिषदेत केली आहे.
खासदार नारायण राणे म्हणाले की, वेगाने लसीकरण करण्यासाठी तसेच रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध करून देण्यासाठी या सरकारकडे नियोजन नसल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. 'नियम पाळा नाहीतर लॉकडाऊन लावू' अशी धमकीच हे सरकार वारंवार देत आहे. पण या लॉकडाऊनमुळे समाजातील विविध घटकांचे किती मोठे नुकसान होणार आहे, याची मुख्यमंत्र्यांना कल्पना नाही. घराबाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेच्या वेदना कशा कळणार, असा सवाल या वेळेस पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा-स्टेट बँकेकडून देखभालीचे काम; डिजीटल सेवा विस्कळित झाल्याने ग्राहक त्रस्त