मुंबई - मुंबई शहरातील मशिदींमध्ये लावलेले बेकायदे भोंगे हटवावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. विशेषतः वांद्रे, वर्सोवा आणि मोहम्मद अली रोड येथील मशिदींवर ही कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांनी शहरातील वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण आदी प्रश्न सोडवण्यासाठी चांगले उपक्रम ( congestion and noise pollution ) सुरू केले आहेत. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्याला अनुसरूनच मुंबईतील मशिदींवर लावण्यात आलेले बेकायदेशीर भोंगे ( illegal loudspeakers ) हटवले पाहिजेत, असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई शहरात मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे हटविले पाहिजेत, अशा मागणीसाठी कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
हेही वाचा-Cylinder Explode Pune : पुण्यातील कात्रज भागात 20 सिलिंडरचा स्फोट, बघा धडकी भरवणारा VIDEO