मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) ईडीच्या रडारवर होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ( Underworld Don Dawood Ibrahim ) मनी लाँड्रींग प्रकरणी ( Money Laundering Case ) ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून त्यांच्यावर नजर होती. ईडीने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले काही तासांच्या तपासा नंतर त्यांना अटक झाली आहे. यावर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार ( Mohit Kamboj hits out at Nawab Malik ) परिषद घेतली. ‘आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलर आणि नवाब मलिकांच्या जावयाचे काय संबंध हे समोर आले पाहिजेत, असे ते म्हणाले. तसेच देशात पहिल्यांदाच नवाबचा मुखवटा उतरताना संपूर्ण देशाने पाहिला आहे, असेही त्यांनी म्हटलं. आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये एकत्र टिफिन खाणार आहेत, असेही ते म्हणाले.
काल नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली. संपूर्ण देशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पदावर बसलेले व्यक्तीचा एक मुखवटा, नवाबचा नकाब, काल पूर्ण देशाने उतरताना पाहिला. महाराष्ट्राच्या राजकारण मागील 20 वर्षांहून अधिक एक व्यक्ती जो सत्तेत होता, ज्याने संविधानाची शपथ घेतली, महाराष्ट्राच्या लोकांचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत होता, एका दलाचा मुंबईचा अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ता अशा व्यक्तीचे संबंध 1993 च्या बॉम्बस्फोटचे आरोपीशी होते. फक्त संबंधच नाही, तर पैशांचीही देवाणघेवाण आहे. याप्रकरणात जस जशी पुढे चौकशी होईल, तसं तसे मोठे खुलासे होतील, असे मोहीत कंबोज म्हणाले.
नवाब मलिक यांचे संबंध फक्त दाऊद इब्राहिम, हसीना पारकर, छोटा शकील यांच्याशीच नाही तर गेल्या काही दिवसांत आम्ही पाहिलं आहे की, नवाब मलिकांचा जावाई ज्याला 550 किलो गांज्यासोबत अटक केली. हे पूर्ण प्रकरण नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज पेडलरच्या प्रवक्ताच्या रुपात देशासमोर आले. तेव्हाच हे समोर आले की, नार्कोटिस डिपार्टमेंटने मलिकांच्या जावयावर कारवाई केली आणि त्यामुळे त्यांच्या दुखत्या नसेवर पाय ठेवला गेला. दरम्यान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलर आणि नवाब मलिकांच्या जावयाचे काय संबंध आहेत, याचा देशासमोर खुलासा झाला पाहिजे. जर कोणती हर्बल तंबाखू आणि वनस्पती बोलून देशातील तरुणांना ड्रग्ज व्यसन लावण्याचे काम करतो आणि त्याला पाठिशी घालण्यासाठी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री रोज पत्रकार परिषद घेऊन देशासमोर येतात. हे देशात कोणाला स्वीकार होणार नाही, असेही ते म्हणाले.
प्रश्न मुंबई पोलिसांचा आहे. 2021 मध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा एक SIT बनवली होती, त्याचा अहवाल अजून आलेला नाही.प्रभाकर साईंच्या आरोपात तथ्य नसेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुंबई पोलिसांनी अहवाल आणला नाही, तर सीबीआय चौकशी व्हावी, सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी मी न्यायालयात जाणार आहे. ईडीने तपास केलेल्या मालमत्तेवर डान्सबार चालायचा, एक मंत्री डान्सबार चालवायचा, नवाब मलिक बांगलादेशी मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावायचा, असे आरोप मोहित कंबोज यांनी केले आहेत.
हेही वाचा -Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कनेक्शन? 'या' प्रकरणात झाली अटक