मुंबई - दापोली येथील मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणात व्यावसायिक विभास साठे यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना तात्काळ सुरक्षा द्या, अन्यथा साठेंचा मनसुख हिरेन होईल, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी व्यक्त केला आहे. पोलीस महासंचालकांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. पोलीस यावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुरक्षा द्या, अन्यथा विभास साठेंचा मनसुख हिरेन होईल; किरीट सोमैयांचा खळबळजनक आरोप - किरीट सोमय्यांचे आरोप
अनिल परब यांच्याशी निगडित सात मालमत्तांवर ईडीने छापेमारी केली होती. दापोलीतील साई रिसॉर्टच्या विक्री प्रकरणात व्यावसायिक विभास साठे यांचे नाव समोर आले आहे. सध्या दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मंत्री अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून जमीन घेतली होती. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैयांनी केला आहे.
अनिल परबांनी घेतली विभास साठेंकडून जमीन, सोमैयांचा आरोप -मंत्री अनिल परब यांच्याशी निगडित सात मालमत्तांवर ईडीने छापेमारी केली होती. दापोलीतील साई रिसॉर्टच्या विक्री प्रकरणात व्यावसायिक विभास साठे यांचे नाव समोर आले आहे. सध्या दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणाची चौकशी सुरू आहे. परब यांनी विभास साठे यांच्याकडून जमीन घेतली होती. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे भाजप नेते किरीट सोमैया यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी, अशी मागणी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे सोमैयांनी पत्राद्वारे केली आहे. विभास साठे यांचा मनसुख हिरेन होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कोण आहेत विभास साठे - पुण्यातील व्यवसायिक विभास साठे यांच्याकडून दापोलीतील रिसॉर्टकरिता परिवहन मंत्री अनिल परब यांनी जमीन खरेदी केली. सुमार १ कोटी १० लाखाला जमिनीचा व्यवहार झाला आहे. या जमिनीच्या व्यवहाराच्या तपासासाठी ईडीच्या पथकाने पुण्यात विभास साठे यांच्या घराची तपासणी केली होती. अनिल परब यांनी विभास साठेंकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.