मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांनी आज ईडी कार्यालयात जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तक्रार केली आहे. जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवार यांचा बेनामी कब्जा असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. जरंडेश्वर कारखान्याचा आर्थिक व्यवहार असलेल्या गुरू कमोडिटी कंपनीसोबत अजित पवार यांचा संबंध काय? असा सवाल किरीट सोमैया यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -किरीट सोमैया आम्हला चॅलेंज करणारे कोण?, ईडी प्रकरणाविषयी रोहित पवारांचा पलटवार
तसेच आयकर विभागाने धाडी टाकण्यात आलेल्या दोन विकासकांबाबत शरद पवार यांनी उल्लेख केला होता. या विकासकांनी 2008 साली अजित पवार यांना प्रत्येकी शंभर कोटी रुपये का दिले? असा सवाल सोमैया यांनी उपस्थित केला आहे. तसेच आज काही महत्त्वाचे पुरावे आपण ईडी अधिकाऱ्यांना दिले असून, लवकरच याबाबत कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असल्याचे किरीट सोमैया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
- कारखान्याशी अजित पवारांच्या बहिणींचा संबंध -