महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya Reaction on Sanjay Raut : ठाकरे सरकारने माझी व कुटुंबियांची जरूर चौकशी करावी; किरीट सोमैयांचे आव्हान - किरीट सोमैया लेटेस्ट न्यूज

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आज किरीट सोमैया यांच्यावर टीका केली आहे. याला सोमैया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज केलेल्या आरोपांबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी, असे आव्हान भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी दिले आहे.

sanjay raut-kirit somaiya
संजय राऊत-किरीट सोमैया

By

Published : Feb 15, 2022, 10:39 PM IST

मुंबई - २०१७ मध्ये खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) संपादक असलेल्या सामनाने माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप केले होते. आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत. या आरोपांबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी, असे आव्हान भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी दिले आहे.

  • किरीट सोमैया यांचे आव्हान -

सोमैया यांनी म्हटले आहे की, ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत. आणखी ३ दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आणखी एका चौकशीस मी तयार आहे. खुशाल चौकशी करा. मी व माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट, चुकीच्या व्यवहारात सहभाग नाही.

संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कोविड उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत मी केलेल्या आरोपांबाबत तसेच त्यांचे प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत एक शब्दही उच्चारला नाही. याकडेही सोमैया यांनी लक्ष वेधले.

  • संजय राऊत यांनी केलेले आरोप -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अलिबागमध्ये बेनामी ( CM Uddhav Thackeray property in Alibaug ) संतप्त असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचे नेते किरीट सोमैया यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत कडाडून ( Shivsena leader Sanjay Raut Press conference ) हल्ला केला. संजय राऊत म्हणाले, की 19 बंगले अलिबाग बांधून ठेवल्याचा दावा करणाऱ्या दलालाला आवाहन आहे. त्यांनी बंगले दाखवून द्यावेत. सगळ्यांना सांगतो, चार बसेस करू. सर्व पत्रकार पिकनिक काढू. बंगले दिसले तर राजकारण सोडू, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. अलिबागमध्ये बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोडे मारीन. शिवसेना जोड्याने मारेन रोज टीव्हीवर दिसत आहेत बंगले... कुठे आहेत बंगले? लोकांच्या मनात खोटेपणा दाखवू नका. दलालाला मराठीचा ( Kirti Somaiya hate marathi ) द्वेष आहे. शालेय शिक्षणात मराठी सक्तीची नसावी, त्यासाठी दलाल न्यायालयात गेला होता. हा भाजपचा दलाल आणि XXX आहे. आधी याचे थोबाड बंद करा, असे संतप्तपणे संजय राऊत यांनी ( Sanjay Raut Slammed Kirit Somaiya ) म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details