महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya on Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार - भाजप नेते किरीट सोमैया - संजय राऊत मानहानी खटला

१०० कोटींच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत ( Kirit Somaiya on Sanjay Raut ) यांच्यावर (आयपीसी ४९९, ५००) अंतर्गत मानहानीचा खटला ( Kirit Somaiya on defamation case against Sanjay Raut) भाजप नेते किरीट सोमैया यांच्या पत्नी प्रा.डॉ. मेधा किरीट सोमैया १८ मे रोजी शिवडी कोर्ट, मुंबई येथे करणार असल्याची माहिती किरीट सोमैया ( Kirit Somaiya news Mumbai ) यांनी दिली आहे.

Kirit Somaiya on defamation case against Sanjay Raut
संजय राऊत मानहानी खटला

By

Published : May 16, 2022, 10:04 AM IST

मुंबई -१०० कोटींच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत ( Kirit Somaiya on Sanjay Raut ) यांच्यावर (आयपीसी ४९९, ५००) अंतर्गत मानहानीचा खटला ( Kirit Somaiya on defamation case against Sanjay Raut ) भाजप नेते किरीट सोमैया यांच्या पत्नी प्रा.डॉ. मेधा किरीट सोमैया १८ मे रोजी शिवडी कोर्ट, मुंबई येथे करणार असल्याची माहिती किरीट सोमैया ( Kirit Somaiya news Mumbai ) यांनी दिली आहे.

माहिती देताना भाजप नेते किरीट सोमैया

हेही वाचा -उताराला लागलेल्या गाडीचा अपघात अटळ, संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर टीका

शिवसेना खासदार संजय राऊत ( Defamation case against Sanjay Raut ) यांनी आयएनएस विक्रांत नंतर किरीट सोमैया यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांचे सर्व आरोप किरीट सोमैया यांनी फेटाळून लावले होते. त्यावेळी सांगताना १०० कोटी हा आकडा आला कुठून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. सोमैया यांनी याबाबत नगर विकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा - भाईंदर पोलीस, मीरा - भाईंदर महानगरपालिका, वन खाते यांना एक पत्र लिहून, कुठलीही कारवाई करण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, असे म्हटले होते. याबाबत बोलताना किरीट सोमैया म्हणाले की यापूर्वीही मी तक्रार केली होती. बदनामीची नोटीस दिली होती. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही. एक रुपयाचाही घोटाळा झाला नाही आहे. घोटाळ्याचे कागदपत्र नाहीत तर हा फक्त दहशतवाद आहे, असा आरोपही किरीट सोमैया यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण? - किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मिरा भाईंदर शहरामध्ये जवळपास १५४ सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्यापैकी १६ शैचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमैया यांच्या पत्नी मेधा सोमैया यांच्या एका संस्थेला मिळाले. युवा प्रतिष्ठान असे या संस्थेचे नाव. कामात बोगस कागदपत्रे तयार करून मिरा भाईंदर महापालिकेची दिशाभूल आणि फसवणूक करण्यात आली. तसेच, या कागदपत्रांच्या आधारे जवळपास साडेतीन कोटींपेक्षाही अधिक रकमेची बिले घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. आता पुढे काय घडते याबाबत उत्सुकता आहे.

हेही वाचा -Fadnavis Vs Uddhav : तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details