महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाकरे कुटुंबीयांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी... किरीट सोमय्यांची जनहित याचिका - kirit somaiya accuses uddhav thackeray

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी अन्वय नाईक आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यात जमीन व्यवहार असल्याचा दावा केला होता. या प्रकरणी सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

kirit somaiya news
ठाकरे कुटुंबीयांनी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी... किरीट सोमय्यांची जनहित याचिका

By

Published : Nov 13, 2020, 12:43 PM IST

Updated : Nov 13, 2020, 3:34 PM IST

मुंबई -भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत त्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच कोविड सेंटर येथील जागेबाबत गैरव्यवहार झाल्याचे काही पुरावे त्यांनी सादर केले होते. मात्र, यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जनहित याचिका दाखल केल्याची माहिती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईच्या महापौरांविरोधात पुरावे सादर करूनही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आम्ही जनहित याचिका दाखल केली आहे, असे सोमय्या म्हणाले. दिवाळीनंतर त्याचा निकाल येण्याची आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे कुटुंबीयांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी... किरीट सोमय्यांची जनहित याचिका

उद्धव ठाकरेंच सरकार भूखंडाच श्रीखंड बनवतंय

गरीब झोपडपट्टी वासियांसाठी बांधण्यात आलेले अर्धा डझनहून अधिक गाळे बेकायदेशीर आणि अपारदर्शक पद्धतीने बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच ही मालमत्ता स्वतःच्या परिवारातील कंपनीच्या ताब्यात ठेवण्याचा आरोप त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केला. याबाबत न्यायालयात पुरावे सादर केले आहेत, असे सोमय्या म्हणाले.

तीन घोटाळे बाहेर काढण्याचं जनतेला वचन

ठाकरे सरकारचे तीन घोटाळे बाहेर काढीन, असं मी जनतेला वचन दिलं होतं. आणि मी ते केलंय, असे सोमय्या म्हणाले. उद्धव सरकारला 1 वर्ष पूर्ण होईल, तेव्हा देखील अजून 3 घोटाळे पुराव्यनिशी बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

अन्वय नाईक प्रकरण

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाईक कुटुंबीयांशी जमीन व्यवहार असल्याचा आरोप केला होता. यानंतर अद्याप उद्धव ठाकरेंनी कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाहीय. शिवसेनेच्या कोणत्याही प्रवक्त्यात दम असेल तर मला उत्तर द्या, असे आव्हान सोमय्यांनी केले आहे. मुरुड येथील जमिनीबाबत विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं द्या, असे ते म्हणाले. अन्वय नाईक परिवार आणि तुमचे काय संबंध आहेत, हे जनतेला ऐकायचं आहे, अशा प्रकारे सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर तीन मोठे घोटाळे केल्याचा आरोप केला आहे.
महापौर एस आर ए जागा प्रकरण ,कोविंड सेंटर जागा प्रकरण , तसेच आता नाईक व ठाकरे कुटुंबीय मुरुड जागा प्रकरण हे तीन प्रकरण किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून लावून घरात याबाबत चौकशी व स्पष्टीकरण द्या अशी मागणी केली आहे.

सोमय्या आज पत्रकार परिषदेत काय म्हटले ?

आज किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. कालपर्यंत अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांचे 21 सातबारे एकत्र असल्याचे कळते, असे ते म्हणाले. मात्र ठाकरे कुटुंबीयांनी अजून काही जमिनीचे व्यवहार नाईक यांच्या कुटुंबीयांसोबत केले आहेत. असे एकूण 40 व्यवहार झाले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहे. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का? अशी प्रश्नांची सरबत्तीच किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा मुख्यमंत्र्यांवर केली.

किरीट सोमय्या काल काय म्हणाले ?

वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ठाकरे कुटुंबाची जमिनीत इतकी गुंतवणूक का आणि कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? मुख्यमंत्री याची माहिती राज्यातल्या जनतेला देणार का? नाईक-ठाकरे-वायकर कुटुंबाचे नेमके संबंध काय? वायकर आणि ठाकरे कुटुंबं कशाला एकत्र आली? जमीन खरेदी व्यवहारात अनेकदा ब्लॅक-व्हाइट असतं. लोकांना तसं वाटतं. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला जमीन खरेदी व्यवहाराची माहिती द्यावी, उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? तसं असेल तर त्यांनी जनतेला सांगावं, असं आवाहन सोमय्या यांनी केले होते.

Last Updated : Nov 13, 2020, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details