मुंबई -शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांची पत्नी डॉ. मेधा सोमैया यांनी संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. 48 तासाच्या आत डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी केल्या प्रकरणात माफी मागण्याची नोटीस किरीट सोमैयांनी पाठवली आहे. अन्यथा न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सोमैया यांनी स्पष्ट केले आहे.
Kirit Somaiya's ultimatum to Sanjay Raut: संजय राऊत माफी मागा, अन्यथा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार - किरीट सोमैया
संजय राऊतांनी 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमैया दाम्पत्यावर केला होता. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया यांची पत्नी डॉ. मेधा सोमैया यांनी संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांनी केला 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप - संजय राऊत यांनी सोमैया कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. त्याचे पुरावे त्यांनी द्यावे, अन्यथा माफी मागावी, असे मेधा सोमैया यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर राऊत यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप बदनामीकारक असून तो पूर्णपणे खोटा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
माफी मागा अन्यथा, कारवाईला सामोरे जा . . . -संजय राऊत यांना माझ्या पत्नीची माफी मागावीच लागेल. एकही कागद न देता ते आमच्यावर आरोप करत आहेत. राऊतांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा सोमैयांनी दिला आहे. किरीट सोमैयांच्या या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा सोमैया-राऊत वाद उद्भवला आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वादामुळे काही दिवसांपुर्वी मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सोमैया पिता-पुत्र सध्या आयएनएस विक्रांत प्रकरणी न्यायालयीन पेचप्रसंगाचा सामना करत आहेत.