मुंबई- कन्नड साखर कारखाना ही शंभर कोटींची मालमत्ता असताना अजित पवार यांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून हा कारखाना केवळ पन्नास कोटी मध्ये खरेदी केला. हा कारखाना रोहित पवार यांच्या मालकीचा आहे. या गैरव्यवहारात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे नुकसान झाले आहे. या घोटाळ्यात पवार कुटुंबीयांची तातडीने ईडी (प्रवर्तन निदेशालाय) ने चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने पवार कुटुंबीयांची चौकशी करावी - किरीट सोमय्या - कन्नड साखऱ कारखाना लिलाव
किरीट सोमय्या यानी कन्नड साखर कारखान्या खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या गैरव्यवहाराचाी ई़डी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी (1 जुलै) ईडीकडून सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सहकारी बँकेचे संचालक अजित पवार असताना हा कारखाना कमी किमतीत लिलावात काढून त्याची विक्री केल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर आहे.
किरीट सोमय्या
आता या प्रकरणानंतर भाजपानेते किरीट सोमय्या यांनी कन्नड साखर कारखाना खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या गैरव्यवहाराचाी ई़डीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात केली आहे.
Last Updated : Jul 2, 2021, 12:46 PM IST