मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैया ( Bjp Leader Kirit Somaiya ) यांनी मंत्रालयात थेट नगर विकास विभागात बसून फाइल तपासल्याने एकच खळबळ माजली होती. या संदर्भात राज्य सरकारने किरीट सोमैया यांना नोटीस बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर आज ( गुरुवारी) किरीट सोमैया ( Bjp Leader Kirit Somaiya in Mantralaya ) यांनी पत्रकार परिषद घेत हिम्मत असेल तर गुन्हा दाखल करा, असे थेट आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना केले आहे. मला कोणत्या कायद्याच्या आधारे नोटीस बजावली, तो कायदा दाखवा, असेही सोमैया यांनी सांगितले आहे. शिवाय इतरही मुद्यांवरुन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
- 'माझ्या जीवाला धोका'
माहितीच्या अधिकारामध्ये मंत्रालयातील नगरविकास विभागात मी फाईल तपासत असताना एका व्यक्तीने येऊन माझा फोटो काढला आणि तो वायरल केला. ही बाब अत्यंत गंभीर असून माझ्या जीवाला याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला शोधून त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकार मला नोटीस पाठवते, हे हास्यास्पद आहे, असे सोमैया यावेळी म्हणाले. ही व्यक्ती आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत संबंधित ठिकाणी आली होती. त्यामुळे याच्यात नक्कीच काहीतरी डाव असल्याचा आरोपही सोमैया यांनी केला.
- 'सरनाईक यांनी घेतला सेल्फी'