मुंबई -भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया ठाकरे सतत शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. ह्या वेळेस शिवसेना आमदार प्रताप सरनाईक परत एकदा त्यांच्या रडारवर आहेत. 'घोटाळेबाज प्रताप सरनाईकवर महाराष्ट्र सरकार कधी कारवाई करणार,'असा सवाल किरीट सोमैया यांनी केला आहे. 'ठाणे येथे प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन B1 B2 नामक 13 मजली व 13 वर्ष जुन्या अनधिकृत इमारती अधिकृत करण्यासाठी आता ठाकरे सरकार पुढे सरसावले आहे,' असा आरोपही सोमैया यांनी केला आहे.
'घोटाळेबाज प्रताप सरनाईकवर महाराष्ट्र सरकार कधी कारवाई करणार?' हेही वाचा -उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली - किरीट सोमैया
13 वर्षे फसवणूक करणार्या प्रताप सरनाईकला ठाकरे सरकारचे अभय - सोमैया
'गेल्या महिन्यात प्रताप सरनाईकांचा हा घोटाळा आम्ही बाहेर काढला. ठाणे महानगरपालिकेने 29 डिसेंबर 2020 रोजी ठाकरे सरकारला विनंती केली आहे, की या इमारती अधिकृत करण्यासाठी आम्हाला मुभा द्या!!! सोनू सूद, कंगना रणौत यांचे घर/कार्यालयाचे बांधकाम 24 तासांत उध्वस्त करण्याचे आदेश उद्धव ठाकरे देतात. परंतु 13 वर्षे फसवणूक करणार्या प्रताप सरनाईकला अभय देण्यात आले आहे,' असा हल्ला किरीट सोमैया यांनी चढवला आहे.
सोमैया यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप
याआधी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता लपविल्याबद्दल किरीट सोमैया यांनी सोमवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांना दिलेल्या तक्रारीत ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपली पाच कोटींची मालमत्ता लपविली आहे. ही जमीन रश्मी ठाकरे यांनी कोर्लाई गावात मृत अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतली होती. परंतु 9 मे रोजी झालेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
हेही वाचा -'बर्ड फ्ल्यू' श्वसनसंस्थेचा रोग; स्थलांतरित पक्षांच्या विष्ठेतून होतो संसर्ग - डॉ. देशपांडे