मुंबई -भाजप नेते किरीट सोमैया यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली आहे. युद्धनौका आयएनएस विक्रांतसाठी ( INS Vikrant Case ) गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणातील अटक टाळण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैया यांनी ( Bjp Leader Kirit Somaiya ) मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने सोमवारी (दि. 11) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. किरीट सोमैया यांच्या वकिलांनी या प्रकरणाची लवकरात लवकर सुनाणी घ्यावी, अशी विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने बजावली नोटीस - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ( Mumbai Police Economic Offences Wing ) किरीट सोमैया यांच्या घरी धडक दिली आहे. सोमैया यांच्या घरावर पोलिसांनी नोटीस बजावली ( Police Summonsed to Somaiya ) आहे. या नोटिशीत किरीट सोमैया आणि नील सोमैया यांना बुधवारी (दि. 13 एप्रिल ) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे सोमैया पिता-पुत्रांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.