मुंबई - शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सात ठिकाणी ईडने छापेमारी केली आहे. या कारवाईवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या नंतर अनिल परब यांनी ही आपली बॅग भरून तयार ठेवावी, असे अटकेचे भाकीत केले. त्यामुळे पुन्हा एकदा ईडीच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जातो आहे.
अनिल परब बॅग भरा! ईडीच्या कारवाईवर सोमैयांची प्रतिक्रिया - अनिल परब यांच्यावर कारवाई
अनिल परब यांच्या सात ठिकाणी ईडने छापेमारी केली आहे. या कारवाईवर भाजप नेते किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया देताना, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या नंतर अनिल परब यांनी ही आपली बॅग भरून तयार ठेवावी, असे अटकेचे भाकीत केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ईडीच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जातो आहे.
![अनिल परब बॅग भरा! ईडीच्या कारवाईवर सोमैयांची प्रतिक्रिया किरीट सोमैयाvअनिल परब](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15388534-thumbnail-3x2-anilparab.jpg)
ईडीकडून आज शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे. राज्यातील एकूण सात ठिकाणी धाडी टाकत गुन्हा दाखल केला आहे. एकाच वेळी धाडी पडल्याने परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांच्यावरती घोटाळ्याचा आरोप केला. परब यांची सेल कंपन्या, पर्यावरण मंत्रालय अशा अनेक चौकशी सुरू आहेत. परब यांचे सहकारी संजय कदम यांच्या घरीही ईडीची धाड पडली आहे.
भाजप नेते सोमैयांनी प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख नवाब मलिक दोघे जेलमध्ये गेले आहेत आता अनिल परब यांनी आपली बॅग भरावी, असे सूचक वक्तव्य केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाई पूर्वी किरीट सोमय्या सातत्याने भाष्य करत आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यानी अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला आहे. सोमैया यांनी केलेल्या ईडीच्या आजच्या कारवाईबाबतचे सूचक वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा -मनी लाँडरिंग प्रकरणी छापेमारी सुरू असलेले कोण आहेत अनिल परब, राजकीय प्रवास