'हे पेंग्विन दाखवण्यात धन्यता मानतात, ही जुनी शिवसेना राहिली नाही' भाजपाचा शिवसेनेवर निशाणा - मुंबई द काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री बातमी
"काय करणार ? यांना फक्त पेंग्विन दाखवायचा आहे आणि यातच हे धन्यता मानत आहेत. ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. ही आता सोनिया सेना झालेय. फक्त पेंग्विन चे तिकीटाच टॅक्स फ्री करू शकतात सत्य दाखवण्याची हिंमत यांच्यात नाही." असं किरण साळुंखे यांनी म्हटलं आहे.
मुंबई -राज्यातील भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दोनही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्यातच द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने तर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापवलं आहे.
एकीकडे हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारकडे करतय तर सरकार ही मागणी फेटाळत आहे. यावर आता भाजपचे नेते व कांदिवली पूर्व विधानसभेचे नेते किरण साळुंखे यांनी संताप व्यक्त केला आहे.
फक्त पेंग्विन दाखवायचा - साळुंखे म्हणाले की, "काय करणार ? यांना फक्त पेंग्विन दाखवायचा आहे आणि यातच हे धन्यता मानत आहेत. ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. ही आता सोनिया सेना झालेय. फक्त पेंग्विन चे तिकीटाच टॅक्स फ्री करू शकतात सत्य दाखवण्याची हिंमत यांच्यात नाही." असं किरण साळुंखे यांनी म्हटलं आहे.दरम्यान, विधानसभेत हा चित्रपट मध्यंतरानंतर रटाळवाणा असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली होती. यावरून देवेंद्र फडणवीस व पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती.