मुंबई -राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार देत भाजपाने सनसनाटी निर्माण केली होती. महाविकास आघाडी सरकारकडे पुरेसे संख्याबळ असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Rajyasabha Election 2022 ) यांनी दिलेला तिसरा उमेदवार म्हणजे नामधारी असल्याची चर्चा होती. मात्र, अशाही परिस्थितीत अपक्षांची मोट बांधत मतांची गोळाबेरीज करण्यात यशस्वी ठरलेल्या फडणवीसांनी तिसरा उमेदवार जिंकून दिल्याची चर्चा ( Bjp Third Candidate Wins Rajyasabha Election ) आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सातच उमेदवार रिंगणात होते. परंतु, महाविकास आघाडी की भाजपाचा उमेदवार जिंकणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. अपक्षांची मते ज्याच्या पारड्यात पडतील तोच विजयी होईल, असे चित्र निर्माण झाले होते. या निवडणुकीत पक्षाची मते फुटू नयेत, तसेच अपक्षांची मते मिळावीत यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. अनेक छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे तोंडी मान्यही केले होते. मात्र, त्यांचे मत परिवर्तन झाल्याचे दिसले नाही, याचे कारण देवेंद्र फडणवीस यांचे मतांचे व्यवस्थापन असल्याचे बोलले जात आहे.