मुंबई -भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर देणार ( Devendra Fadnavis Rally ) आहेत. शनिवारी रात्री बीकेसीच्या मैदानावरून मुख्यमंत्र्यांनी ( CM Thackeray Mumbai Rally ) भाजपला आव्हान दिले होते. विशेष करून त्यांनी वैयक्तिकरित्या फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला ( Uddhav Thackeray Criticized Devendra Fadnavis ) होता. त्यामुळे मुंबई भाजपच्या सर्व हिंदी भाषिक नेत्यांनी आता एकजूट दाखवत शिवसेनेला त्याच शैलीत चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा ( MLA Mangal Prabhat Lodha ) यांनी गोरेगावच्या नेस्को मैदानावर ( Goregaon Nesco Ground ) आयोजित केलेल्या हिंदी भाषेतील संकल्प संमेलनाच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. भाजपशी संबंधित सर्व हिंदी भाषिक नेत्यांवर त्यांनी कामांची विभागणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेला १५ हजारांहून अधिक लोकांची गर्दी होणार आहे. या संमेलनात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांचे आवाहन ऐकण्यासाठी सुबुद्ध वर्ग मोठ्या संख्येने येणार आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक विनोद मिश्रा गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील आहेत.
जवाब मिलेगा, ठोक के मिलेगा :काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना भाजपवर तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली होती. मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव उघड झाला आहे, मात्र तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील असा इशारा देत भाजपच्या विकृत, विकारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केली होती. मुख्यमंत्री यांच्या टीकेला आज त्याच पद्धतीचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षित आहे. तसेच काल ट्विट करून देवेंद्र फडवणीस यांनी, "जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा", असं सांगितलं असल्याकारणाने, या सभेला हजारोंच्या संख्येने गर्दी होणार आहे.
उत्तर भारतीय मोर्चाची टीम दाखवणार ताकद? :भाजप उत्तर भारतीय मोर्चा (महाराष्ट्र) अध्यक्ष संजय पांडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो हिंदी भाषिक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमुळे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी मुंबई आणि एमएमआर भागातील उत्तर भारतीय मोठ्या संख्येने या परिषदेच्या ठिकाणी पोहोचण्याची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या कामात त्यांचे ब्रिजेश सिंग, संतोष सिंग, अनिल राय आणि चिराग गुप्ता हे पदाधिकारी अत्यंत मौन बाळगून अप्रतिम काम करत आहेत.